फॅन्सी ड्रेस स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

पिंपरी : दत्ता सूर्यवंशी :डेक्कन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल. (पिंपरी) पूर्व प्राथमिक विभागात आज दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभा निमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार दत्ता सूर्यवंशी यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना स्मुर्तिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख श्रीमती संगीता लोखंडे, सम्राटचे छाया चित्रकार जगन्नाथ कांबळे, कार्यक्रमाचा मूळ हेतू म्हणजे आपला भारत देश हा विविध कला गुणांनी नटलेला, सांस्कृतिक वारसा असलेला असल्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध क्रांतिकारी, स्वातंत्र्यसेनानी, देशाचे जवान, रक्षक, समाजसेवक यांची वेशभूषा केली.
त्याचप्रमाणे मुलांच्या विश्वातील परी, आईस्क्रीम, घड्याळ, आंबा, नारळ वारकरी यांचे सुंदर असे कपडे घालून सादरीकरण केले त्याचप्रमाणे उत्तम असा समाजाला मेसेज जाईल या हेतूने प्लास्टिकचा वापर टाळा,सिग्नल चा वापर करा, पाण्याची बचत करा याचंही उत्तम सादरीकरण मुलांनी केले. त्याचप्रमाणे कमी वापरात असलेली टपाल पेटी सुद्धा मुलांना माहीत झाली.
या फॅन्सी ड्रेसचे प्रमुख आकर्षण व भारताचा अभिमान असलेले म्हणजेच भारताचे चंद्रयान अतिशय उत्कृष्ट रित्या बनवून सुंदर अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. मुलांचे मनोबल वाढावे उत्सुकता वाढावी आणि त्यांच्या सहभागाचे कौतुक म्हणून विद्यार्थ्यांना बक्षीसही देण्यात आले.
अमृत महोत्सवाची सांगता खूप सुंदर रित्या व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शामला दाभाडे , मनीषा भिसे, शालिनी क्षीरसागर यांनी मुलांची बैठक व्यवस्था केली होती. श्रीमती दर्पनिका कदम अगदी खेळीमेळीच्या वातावरणात आनंदाने कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनश्री पाटील सूत्रसंचालन वैशाली निचित यांनी आणि आभार तबस्सुम सुतार यांनी मानले.
× How can I help you?