आळंदी ( मल्हारभाऊ काळे) : येथील मोशी आळंदी रस्त्यावरील वैभवी वेदश्री तपोवन मध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांनी आपल्या जीवनयात्रेची ७४ वर्ष पूर्ण करत ७५ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त आणि पुण्यप्रद श्रावण अधिकमासा निमित्त वेदश्री तपोवन, आळंदी येथे विविध धार्मिक उपक्रमांचा समावेश असलेल्या दोन दिवसीय आणि ३३ कुंडीय महाविष्णूयागचा वेदमंत्रजय घोषात प्रारंभ झाला.