आळंदी सिद्धबेटात अधिकमास कीर्तन महोत्सवास हरिनाम गजरात प्रारंभ

आळंदी ( मल्हारभाऊ काळे) : येथील आळंदी जनहित फाऊंडेशन संचलित उपक्रमात सिद्धबेट अधिकमास निमित्त कीर्तन महोत्सवाची पर्वणीस ३ ते ९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत स्व. दशरथ बालवडकर यांच्या स्मरणार्थ हरिनाम गजरात प्रारंभ झाला.

सिद्धबेट आळंदीत एक महिनाभर अधिकमास निमित्त अखंड हरिनाम सप्ताह शृंखलेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील तिसऱ्या सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ अध्यक्ष विलासतात्या बालवडकर यांचे हस्ते कलश पूजन, आळंदी नगरपरिषद कार्यालयीन अधीक्षक किशोर तरकासे यांचे हस्ते व्यासपीठ पूजन करून झाले
या प्रसंगी रयत क्रांती संघटनेचे प्रवर्तक गजानन गांडेकर, भरत महाराज बालवडकर, रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, अधिकमास उत्सव मुख्य समन्वयक अर्जुन मेदनकर, युवा उद्योजक राहुल चव्हाण, माऊली दास महाराज, सचिन महाराज शिंदे, कामगार नेते अरुण घुंडरे, पत्रकार महादेव पाखरे अविनाश राळे, सुनील बटवाल, बद्रीनारायन घुगे, संतोष भोकसे आदी उपस्थित होते.
या सप्ताहात किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वणीचा लाभ भाविक, नागरिकांनी घ्यावा असे आवाहन अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांनी केले आहे.
आळंदी सिद्धबेट अधिक मास उत्सव समितीचे प्रमुख अर्जुन मेदनकर यांचे संकल्पनेतून यावर्षीचे अधिकमास निमित्त सिध्दबेटात अखंड हरिनाम सप्ताहाची शृंखला महिनाभर आयोजित करण्यात आली आहे. यातील तिसऱ्या सप्ताहात श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, माऊली भक्त वारकरी, आळंदी नगरपरिषद यांच्या माध्यमातून अधिक मास निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अधिकमास तिसरा सप्ताह स्व. दशरथ बालवडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला असून ३ ते ९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत कीर्तन महोत्सव होत आहे. व्यासपीठ चालक रामचंद्र महाराज सारंग, कृष्णा महाराज कोलते करीत असल्याचे संयोजक अर्जुन मेदनकर यांनी सांगितले.
दैनंदिन कार्यक्रमात पहाटे काकड आरती, सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन सेवा सुरू झाली. या कीर्तन महोत्सवात शरद महाराज पाटील, राजेंद्र महाराज शास्त्री, राजेंद्र महाराज धुमाळ, संजय महाराज वाटकर, पांडुरंग महाराज राजूरकर, रामचंद्र महाराज सारंग, माऊली महाराज करंजीकर यांची कीर्तन सेवा होत आहे. या सोहळ्यात भजन सेवा ज्ञानभक्ती अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, श्री स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, बाळकृष्ण महाराज फणसे दिंडी क्रमांक ८८, शांती ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था आळंदी, रामकृष्ण महिला भजनी मंडळ आळंदी, श्रीराम कृष्ण वारकरी शिक्षण संस्था यांची भजन सेवा होणार आहे यावेळी मृदंग साथ रवींद्र कुमकर, सुनील वलेकर, सौरभ बागल, पवन लिंगायत, कल्याणी शिंदे, वेदांत कोळेकर, प्रणव पारठे, युवराज चिकणे, ओंकार यादव, सार्थक डावखर, ज्ञानेश्वरी शिंदे, आदित्य धनवटे, सार्थक वाटकर, बजरंग बुटले, गंगाधर सोळंके साथ देत आहेत. रामचंद्र महाराज सारंग, संजय महाराज वाटकर, कृष्णा कोलते, वैभव गलधर, चक्रधर गलधर, अशोक सालपे, अजिंक्य सीरसकर, सोपान बुटले, पृथ्वीराज कराळे, ज्ञानेश्वरी कडवे, वैष्णवी जाधव गायन साथ देणार आहेत. सप्ताहाच्या काळात माउली भक्त विलास महाराज बालवडकर यांच्या वतीने महाप्रसाद होत आहे. श्रीराम कृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे म्हणाले, वारकरी भाविकांनी या ज्ञानदान यज्ञाचा लाभ घेऊन पवित्र अधिक मास पर्वणीत कीर्तन, भजन श्रवण सुखाचा आनंद घ्यावा. आळंदी सिद्धबेट अधिक मास उत्सव समितीचे प्रमुख अर्जुन मेदनकर यांचेसह हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे नूतन पदाधिकारी महादेव पाखरे अविनाश राळे, सुनील बटवाल, बद्रीनारायन घुगे या मान्यवर पत्रकारांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
× How can I help you?