15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्प मध्ये बाल आनंद मेळावा

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कॅम्प भागातील बंदर वस्ताद तालीम जवळ बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी सुमारे 500 विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले.या मेळाव्यामध्ये सुमारे दीड हजार लहान मुलांनी याचा आनंद लुटला तसेच या ठिकाणी लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला

या बाल मेळाव्याचे आयोजन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष व सोशल फाउंडेशन चे संस्थापक मंजूर शेख यांच्या वतीने करण्यात आले यावेळी माजी आमदार मोहन जोशी,माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी एहसान खान,माजी नगरसेवक अविनाश बागवे,सौरभ अमराळे,मंजूर शेख,सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष फुरखान शेख,प्रशांत श्रीगिरी हैदर शेख, मुजफ्फर अक्तार,फैजान सय्यद,आबिद शेख,प्रतीक परदेशी,फुरखान पठाण आदि यावेळी उपस्थित होते
× How can I help you?