दै सम्राट चे भीमा कोरेगांव तालुका प्रतिनिधी रामदास लोखंडे यांचा वाढदिवस बोपोडीत उत्साहात साजरा.

दै.वृत्तरत्न सम्राट च्या माध्यमातून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार  विरोधात आपल्या लेखणी द्वारे आवाज उठविणारे समाज जागृती करणारे सम्राटचे भिमाकोरेगाव प्रतिनिधी आयु . रामदास लोखंडे यांचा वाढदिवस बोपोडी येथे केक कापून शुभेच्छा देऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सम्राट विचार मंच च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी संस्थापक अध्यक्ष पत्रकार दत्ता सूर्यवंशी प्रमुख उपस्थिती बहुजन भीम सेना अध्यक्ष मोहन मस्के, मातंग युवक आघाडी अध्यक्ष अंकुश साठे, धम्मक्रांती महोत्सव समिती अध्यक्ष इंद्रजित भालेराव, एकता मानव सेवा संघटना अध्यक्ष सादिकभाई शेख, काँग्रेस प्रवक्ते करीमभाई तुर्क, काँग्रेस जेष्ठ कार्यकर्ते मैनूभाई अत्तार, सचिव सुरेश पवार, बी एम कांबळे, शंकरदादा कांबळे, रवी नायर, अकबर शेख, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सम्राट उपसचिव ऍड. विठ्ठल आरुडे यांनी केले.
× How can I help you?