आळंदी (मल्हार भाऊकाळे) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत या वर्षी श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला. नेहमी प्रमाणे भाविकांच्या गर्दीने माऊली मंदिर परिसर गजबजून गेला होत. यावर्षीही श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली. श्रावणातील पहिल्या सोमवार दिनी श्री आळंदी धाम सेवा समितीचे वतीने अध्यक्ष युवा उद्योजक राहुल चव्हाण यांचे वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील, माऊली मंदिराचे व्यवस्थापक माऊली वीर यांचे हस्ते भाविकांना दूध प्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदी श्री सिद्धेश्वर महाराज मंदिरात ग्राम क्षेत्रोपाध्ये ज्ञाना सोमनाथ वाघमारे यांनी पौरोहित्य केले.