लोहगाव धानोरी रोड वरील चेंबरला हळदी कुंकू,धूप अगरबत्ती ची पूजा करून आंदोलन आयोजक सुशांत माने युवा फाऊंडेशन*

लोहगांव : पुणे महानगरपालिकेचा एक महिना पाठपुरावा करून सुद्धा लोहगाव धानोरी जकात नाका या ठिकाणचा चेंबर दुरुस्त होत नव्हता, त्यामधून वाहणारा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होता त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती त्याच्या निषेधार्थ सुशांत माने युवा फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघा तर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. सदर चेंबरची हळदी कुंकवाने पूजा केली व त्या ठिकाणी धूप कापूर अगरबत्ती लावून नागरिकांतर्फे फुले वाहण्यात आली. यावेळी अर्जुन गरुड, सुभाष काळभोर, निलेश पवार,शांताराम खांदवे, गणेश खांदवे, अमोल खांदवे, राजू टिंगरे, सुदर्शन भांडवलकर, श्रीमंत राठोड, अशोक कांबळे तसेच सोसायटीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुशांत माने युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष सुशांत गोमाजी माने यांनी एक अनोखे आंदोलन करून पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला सत्य परिस्थिती दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

× How can I help you?