आळंदी ( मल्हार भाऊ काळे ) : क्रांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची ११५ वी जयंती विविध सेवा भावी संस्थांचे वतीने विविध उपक्रमातुन देशभक्तिमय वातावरणात साजरी झाली. आळंदीतून श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील शालेय मुलांची फेरी रॅलीचे माध्यमातून झाली. हुतात्मा राजगुरू यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाट्य प्रयोग मुख्याध्यापक रविंद्र चौधरी यांनी सादर केला.