कळस :ज्वेल्स ऑफ आलेगावकर माजी विद्यार्थी यांच्या वतीने शालेय साहित्यांचे वाटप.

39 वर्षा नंतर एकत्रित येऊन समाजाचे काहीतरी देणे आपण लागतो या उद्देशाने स्थापन झालेल्या माजी विध्यार्त्याच्या वतीने आज गेली दोन वर्ष विविध कार्यक्रम राबविण्यात आले त्यापैकी आज कळस येथील कै. सीताराम देवकर प्राथमिक विद्यालयातील मनपा शाळा क्र. 170 मुलांची शाळा क्र.93 मुलींची या विद्यार्थी विद्यार्थ्यांना शालो उपयोगी वस्तूंचे वाटप खडकी येथील ज्वेल्स ऑफ आलेगावकर चे माजी विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माजी सेवा निवृत्त सैनिक पोपट आल्हाट प्रमुख उपस्थिती शाळेच्या मुख्याध्यापिका विजया कुंजीर, ज्वेल्स संस्थापक अध्यक्ष सुधीर भोगावडे, काँग्रेस पुणे शहर कमिटी चिटणीस ज्वेल्स चे उपाध्यक्ष संजय धापटे, पत्रकार दत्ता सूर्यवंशी, हुमेन राईट्स चे ऑफिसर राजू  धापटे, उद्योजक सुहास मिरजकर, इनव्हेसमेंट कंसल्टंटन्स आनंद शिर्के, महेंद्र चव्हाण, प्रदीप महाडीक, जगन्नाथ परब, शिक्षक राजाराम लोखंडे, सुचित्रा डाळिंबकर, अनिता कुदसी, अंजली चिपाडे, उर्मिला सांगाडे, कांचन कडू , विजय चव्हाण, जयदीप खेडेकर, सुमित तुळवे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्त्यानी आपल्या हाताने बनविलेल्या राखी याचे प्रदर्शनाचे उदघाट्न माजी निवृत्त सैनिक पोपट आल्हाट यांच्या हस्ते करण्यात आले. या नंतर रक्षाबंधनाचे अवचित्य साधून शाळेच्या आवारातील वृक्षांना राखी बांधण्यात आली. शालो उपयोगी साहित्यांचे वाटप ज्वेल्स ऑफ आलेगावकर चे सर्व माजी विद्यार्थी पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजिनिअर सुधीर भोगावडे सूत्रसंचालन राजाराम लोखंडे आणि आभार नेहा शिंदे यांनी मानले.
× How can I help you?