दिवंगत माजी राज्यसभा खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पत्नी “श्रीमती नीलिमा वसंतराव चव्हाण” (वय ७६) यांचे रविवारी (२७ ऑगस्ट २०२३) सायंकाळी वृद्धापकाळाने पुणे येथील राहत्या घरी निधन झाले. रविवारी त्यांच्या पार्थिवावर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. युग फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. कणव वसंतराव चव्हाण यांच्या त्या आई होत्या.