विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणार.        विशाल शेवाळे.

दत्ता सूर्यवंशी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  क्रीडा विभाग मंडळा मार्फत राबविल्या जाणाऱ्या  विविध स्तुत्य उपक्रम आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा साठी राबविले जातील असा विश्वास डी सी एम सोसायटीचे जनरल  सेक्रेटरी विशाल  शेवाळे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय क्रीडा  दीना निम्मित आयोजित कार्यक्रमात शेवाळे साहेब बोलत होते.

अहिल्याश्रम नाना पेठ,पुणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे जनरल सेक्रेटरी विशाल भाऊ शेवाळे
विशेष उपस्थिती  प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक गौरी कर्डिले मॅडम मुंबई, प्राचार्य डॉ.जे.के म्हस्के,कार्यक्रमाचे संयोजक शारीरिक शिक्षण संचालक प्रसाद कर्डिले, अधीक्षक किशोर भुजबळ इत्यादी उपस्थित होते.क्रीडा दिनानिमित्त मार्गदर्शन करताना शेवाळे साहेब म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न होतोय याचा मला मनस्वी आनंद आहे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाच्या स्पर्धा आयोजित कराव्यात त्यासाठी लागणारे सर्व क्रीडा साहित्य व क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धा आयोजित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यास संस्था कटिबद्ध आहे .कर्डीले मॅडम म्हणाल्या एमपीएससी,यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी  बौद्धिक,शारीरिक या दोन्ही गोष्टींची अत्यंत गरज असते. महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वेगवेगळ्या विविध  स्पर्धेमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे. तुमच्यामध्ये असलेल्या क्रीडा विषयक सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम महाविद्यालय राबवत असते याचा फायदा  सर्वांनी घेतला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप-प्राचार्य डॉ.नरेश पोटे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ.बाळासाहेब सोनवणे  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसाद कर्डिले यांनी तरआभार प्रदर्शन डॉ.जयश्री कांबळे यांनी केले.
× How can I help you?