खडकी : दर वर्षी आपल्या भारतीय जवानांना महिला भगिणींकडून राखी बांधण्याचा कार्यक्रम खडकी येथे घेण्यात येतो त्या कार्यक्रमात आम्ही देखील तुमच्या बरोबर आहोत आमचे रक्षण करताना आपण जखमी झालात त्याची पर्वा न करता आपण ज्या ध्येयाने लढलात त्याला माझ्या वतीने सलाम. अशा शब्दात माजी नगरसेवक आनंद छाजेड यांनी सैनिकी अस्पताल येथे सदिच्छा भेट देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.