बोपोडी कडून खडकी बाजाराकडे जाणार रस्ता तसेच बोपोडी कडून वाकडेवाडी कडे जाणारा रस्ता गेल्या तीन वर्षांपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद आहे.यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत होता तसेच नागरिकांना आर्थिक भुर्दंड देखील बसत होता, याबाबत संबधीत अधिकाऱ्यांना वेळोवेळी भेटून सदरचे दोन्ही रस्ते खुले करण्याबाबत दोन ते तीन वेळा निवेदन दिले आहे तथापि संबधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.यामुळे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, बोपोडी, खडकी काँग्रेस ब्लॉक कमिटी यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.