आळंदीत श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव उत्साहात साजरा ११ ब्रम्ह्व्रुन्दाचा वेदमंत्रजयघोषात अभिषेक

आळंदीत श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव उत्साहात साजरा
११ ब्रम्ह्व्रुन्दाचा वेदमंत्रजयघोषात अभिषेक

आळंदी( मल्हार भाऊ काळे) : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत धार्मिक कार्यक्रमांनी प्रथापरंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात साजरा झाला.मोठ्या प्रमाणात भाविकांचे उपस्थितीत धार्मिक सप्ताह सांगता काल्याचे कीर्तन आणि दहीहंडीने झाली.जन्मोत्सव दिनी घंटानाद, पुष्पवर्षाव, कीर्तनसेवा, गावकरी भजन सेवा उत्साही हरिनाम

गजरात झाली. भाविकांनी श्रींचे दर्शन घेत महाप्रसाद घेतला.

श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने मंदिरातील परंपरेने गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीचे जन्मोत्सव अवतार दिनी पहाटे घंटानाद, काकडा, श्रीना पवमान अभिषेक पूजा, दुधारती,११ ब्रम्ह्व्रुन्दाचा वेदमंत्रजयघोषात अभिषेक करण्यात आला. भाविकांचे समाधी दर्शन, दुपारी श्रीचा गाभारा स्वच्छता आणि श्रीना उपवासाचा महानैवेद्य झाल्यानंतर भजन उत्साहात झाले. श्रीचे दर्शनास गाभा-यातून भाविकांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर श्रीना वैभवी पोशाख करण्यात आल्याने श्रींचे श्रीकृष्ण अवतारतील रूप

Recent Post

× How can I help you?