अंमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपळे निलखमधुन एकुण एक लाख शहाणन्नव हजार नऊशे तीस रुपये किमतीचे एकुण १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची दोन गांजाची झाडे जप्त केली.
पिपळे निलख पुणे येथे मोकळ्या जागेत एका इसमाने गांजा विक्रीसाठी गांज्याची झाडे लावली आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरुन सदर ठिकाणी छापा टाकला टाकून धानेश अनिरुध्द शर्मा,विक्रांत टकले यांच्या रूम मध्ये राहणारा मुळचा बिहार यास ताब्यात घेतले.
सदरथी कामगोरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे,सह पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे,अप्पर पोलीस आयुक्त चसंत परदेशी,पोलीस उप आयुक्त,गुन्हे स्वप्ना गोरे,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे- १ बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील,सहा पोलीस निरीक्षक प्रशांत महाले,पोलीस उप-निरीक्षक राजन महाडीक तशेच इतर पोलीस कर्मचारी यांनी केली आहे.