माता वेलंकनी यांचा कॅम्पमध्ये जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
ख्रिश्चन समाजातील माता वेलंकनी यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतरत्न सेंट मदर तेरेसा फाउंडेशन च्या वतीने पुणे कॅम्प पुलगेट येथे एन्स चर्च येथून माता वेलींकणी यांना प्रार्थना करून मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधवांच्या उपस्थितीमध्ये माता वेलींकणी यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी ही मिरवणूक सेंट अँन्स चर्च येथून पुलगेट सोलापूर बाजार चौक, महात्मा गांधी बस स्टॅन्ड,मदर तेरेसा चौक येथून सेंट एन्स चर्च येथे समारोप करण्यात आला.
यावेळी सर्व समाज बांधवांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन भारतरत्न सेंट मदर तेरेसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बबलू रॉयल यांनी केले तसेच यावेळी एडवर्ड जेकब,रेबो जेकब फ्रान्सिस जेकब,स्टेला जेकब, जेसिंता रॉयल, गीता नायडू, नरेश जाधव,दिनेश परदेशी, संतोष गायकवाड,दिनेश आरडलकर, मायकल साठे आदि यावेळी उपस्थित होते.