ज्वेल्स ऑफ आलेगावकर माजी दिवंगत मित्रांना श्रद्धांजली खडकी : पी.एस.आय.स्व.प्रवीण कदम, पी.एस.आय.स्व.अशोक खंडाळे आणि नुकतेच निधन झालेले ऍड.स्व.सिध्दार्थ सूर्यवंशी या दिवंगत मित्रांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम खडकी आलेगावकर विद्यालया च्या प्रांगणात आज घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी ज्वेल्स ऑफ आलेगावकर चे अध्यक्ष पोपट आल्हाट आणि प्रमुख उपस्थिती महेंद्रकुमार, अनिल थोरात, चक्रपाणी, जगन्नाथ परब, राजू शिंदे, सतीश महाजन, कुमार बहिरट, विजय दांगट, संजय जवळकर, संजय शेवाळे, तात्या सस्ते, उध्दव जाधव, राजू हुगे, दिनेश मोंदू , प्रदीप कदम, राजू रेड्डी, आणि फोन वरून संजय धापटे, राजू धापटे, राकेश सहाय, विजय दळवी, ऍड. विठ्ठल आरुडे, यांनी श्रद्धांजली वाहिली. प्रत्येकांनी आपले मत व्यक्त करताना तिघाही मित्रांचे विविध गुणांच्या पैलूं वर आठवणी सांगून स्मुर्तीना उजाळा दिला. शेवटी दोन मिनिटे स्तब्ध ऊभे राहून श्राद्धांजली वाहून आपला अनमोल ग्रुप असाच पुढे चांगले कार्य करत रहावा अशी सदिच्छा सर्वांनी एकमताने केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले.