महिला वर्गाच्या कलागुणांना बरोबरीने न्याय देण्यासाठी औंध रोड भाऊ पाटील पडाळ वस्ती येथे प्रथमच महिला दहीहंडी उत्सवा चे आयोजन दि. 9 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सावित्रीबाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांच्या साठी दहीहंडी महोत्सव आयोजित केला होता. या महोत्सवाचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष दिपकभाऊ मानकर यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन करून उदघाट्न करण्यात आले.या प्रसंगीं प्रमुख उपस्थिती आमदार दीप्तीताई चौधरी, अभिजित बोके, आनंद छाजेड, ऍड, रमेश पवळे, प्राजक्ताताई गायकवाड, उद्योजक योगेश शेलार, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर उपाध्यक्ष विजय जाधव, चिटणीस शशिकांतभाऊ पांडुळे, गोविंद पवार, मनोज सूर्यवंशी, इंद्रजित भालेराव, बाळासाहेब आहेर, कमलबाई गायकवाड, कांताताई ढोणे, ज्योतीताई परदेशी, वसुंधराताई नीरभवने,अख्तरी शेख, प्रकाश सूर्यवंशी, गणेश बनकर, साजिद शेख, दत्ता शेडगे, भीमराव माने, इत्यादी मान्यवर महोत्सवात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले. या वेळी लोकप्रिय नृत्यांगना नमिता पुणेकर, श्रुती पुणेकर, नंदिनी गाजणे या कलाकारांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
हा महिला दहीहंडी महोत्सव यशस्वी करण्यासाठी सुवर्णाताई शशिकांत पांडुळे, स्वातीताई जाधव, मंगलताई जाधव, माधुरीताई जाधव, कमलताई लादे, सुवर्णाताई लोंढे, कांचनताई पांडुळे, किरणताई आंबिडे, ललिताताई कांबळे, शशिकलाताई लोखंडे, रत्नमालाताई कदम, उषाताई आगरवाल इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.