काँग्रेसच्या जन संवाद यात्रेला छत्रपती शिवाजी नगर मतदार संघात जोरदार प्रतिसाद.

काँग्रेसच्या जनसंवाद पद यात्रेला शिवाजी नगर मतदार संघात जोरदार प्रतिसाद.
बोपोडी : दि.12. दि दत्ता सूर्यवंशी. लोकशाही आणि राज्य घटना संपविण्याचे काम भाजप करीत आहे या मनमानी कारभाराला सर्वसामान्य जनता आता कंटाळली आहे. येत्या निवडणुकीत जनता या भाजपाच्या मनमानी कारभाराला चोख उत्तर दिल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी व्यक्त केला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात चिखलवाडी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अरविंद शिंदे, दीप्तीताई चौधरी , विनोद रणपिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जनसंवाद पद यात्रेची सुरुवात करण्यात आली. खडकी स्टेशन, एल आय सी रोड, औंध रोड चौक, पडाळ वस्ती, छत्रपती शिवाजी उद्यान, भीमज्योत नगर, सर्वे नं 24,25,26, भाजी मंडई, या मार्गातून यात्रा काढण्यात आली आणि समारोप सभा डॉ. बाबसाहेब आंबेडकर बोपोडी चौकात घेऊन करण्यात आला. या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे, महा. प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, मा. महापौर कमलताई व्यवहारे, मा. उपमहापौर रजनीताई त्रिभुवन, माजी नगरसेविका लताताई राजगुरू, काँग्रेस सरचिटणीस पुणे शहर विनोद रणपिसे, कैलासदादा गायकवाड, ऍड. नंदलाल धीवार, गौरवजी बोऱ्हाडे, कान्होजी जेधे , अध्यक्ष शिवाजी नगर काँग्रेस ब्लॉक कमिटी अजित जाधव , बोपोडी काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष विशाल जाधव, राजेंद्र भुतडा, डी वाय एस पी अनिल पवार, किशोर वाघमारे,विजय कांबळे , योगेश पवार , रमा भोसले , कांता ढोणे, माया मोरे , सुंदरताई ओव्हाळ,विमल खांडेकर , अरुणा चेमटे , उषा जाधव, प्रियांका मधाळे, प्राजक्ता गायकवाड, ऍड. विठ्ठल आरुडे, सेल्व्हराज अंथोनी ,बाबा सैय्यद सचिन बहिरट रोहित बहिरट , हनुमंत पवार, प्रशांत टेके, साजिद शेख, अँथनी दास , अजित थेरे , चंदाताई अंगीर, लता घडसिंग, अमीना शेख, मालन काकडे, शोभा पाटोळे, गंगुबाई वाघमारे, अमित अगरवाल आणि बहुसंख्य काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

काँग्रेसच्या जन संवाद यात्रेला शिवाजी नगर मतदार संघात जोरदार प्रतिसाद.

Recent Post

× How can I help you?