युग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कनव चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिवंगत माजी खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव युग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष कनव चव्हाण यांनी पुणे येथील मोदी
बाग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शरद पवार साहेब यांच्या हस्ते कनव चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चिन्ह असलेली उपरणे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पुण्याचे माजी महापौर अंकुशराव काकडे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप, रवींद्र अण्णा माळवदकर,आप्पा म्हस्के, शिल्पाताई भोसले,मयूर गायकवाड,नरेश पेगडालू,आदि यावेळी उपस्थित होते. यावेळी कनव चव्हाण म्हणाले,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवणार युवा कार्यकर्त्यांची संवाद साधून पक्षाची बांधणी करणार पक्षाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबविणार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता संवाद शिबिर घेणार असे यावेळी सांगितले