आळंदी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर

आळंदी ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिर

आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयात आयुष्यमान भव योजने अंतर्गत रक्तदान शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या शिबिरास रुग्णालयाचे कर्मचारी आणि नागरिकांनी सहभागी होऊन उत्स्फुर्द प्रतिसाद दिला.
या शिबिराचे उदघाटन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पांडुरंग गावडे ( आमदार दिलीप मोहिते प्रतिनिधी ), आळंदी ग्रामीण रुग्णलयालयाचे अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे, डॉ. शुभांगी नरवडे,

डॉ. सुमन कांबळे पूणे,जिल्हाध्यक्ष मल्हार भाऊ काळे आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, परशुराम जाधव, हमीद शेख, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, सामाजिक कार्यकर्ते संजय घुंडरे, डॉ विवेकानंद दाताळ, गोरखनाथ दराडे, रुक्मिणी मोरे, लीला साबळे, अशोक कावळे आदी उपस्थित होते. रक्तदान शिबिरात ससून सर्वोपचार रुग्णालयाचे रक्त पिढीचे माध्यमातून रक्त संकलन करण्यात आले. या शिबिरात कर्मचारी आणि नागरिकांनी रक्तदान करून शिबीर यशस्वी केले. यासाठी अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, डॉ. शुभांगी नरवडे आणि सर्व कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले. यावेळी सर्व सहभागी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

× How can I help you?