खडकी शिक्षण संस्था,खडकी येथे चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व जी.एम. आय.कन्या शाळा यांच्या वतीने “गणेशउत्सव” आरती सोहळा संपन्न
“विद्यावंतांचा पूर्वज । ज्ञानमार्गाचा अग्रज
भक्तिवृक्षाचे आदिबीज । मायातीत गणेश” ||
– श्रीगणेश एकविशी सालाबादप्रमाणे खडकी शिक्षण संस्थेच्या वतीने गणेशोत्सव सोहळा संपन्न झाला आहे. सदर सोहळा बुधवार 20 सप्टें.रोजी चेतन दत्ताजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व जी.एम.आय कन्या शाळा यांच्या वतीने संपन्न झाला.सदर मंगलमय सोहळ्यास रमेश अवस्थी संचालक खडकी शिक्षण संस्था यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली.या कार्यक्रमात प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सरीता नायर,उपमुख्याध्यापिका हेना शहा,पर्यवेक्षक गिरिष ननावरे तर जी.एम आय कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता काकडे व कन्या शाळेचा सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यीनी उपस्थित होत्या.चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मिडीयम स्कूल च्या सहशिक्षिका उषा गोड्डे ,ऋतुजा मोरे,अनुराधा आटोळे उपस्थित होत्या.तर शाळेतील सेवक वृंदही उपस्थित होता.तर इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी श्रींची मंगलमय पूजा तसेच गणपती अथर्वशीर्ष चे पठण व आरती उत्कृष्टरित्या सादर केली.तर ज्ञानेश्वरी आटोळे इ.७ वी तील विद्यार्थिनीने जय गणेश ही प्रार्थना सादर केली.
“गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया” ||