आळंदीत मुलींवरील भ्याड हल्ला लक्षवेधी हलता देखावा
आळंदी (मल्हार भाऊ काळे) : येथील मरक ळ रस्त्यावरील शंभुराजे मित्र मंडळ ( राजे ग्रुप ) यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत असुंमंडळाने यावर्षी पुण्या घडलेल्या घटनेवर आधारित मुलींवरील भ्याड हल्ला हा लक्षवेधी देखावा सादर करीत समाज प्रबोधनाचे कौतुकास्पद कार्य केले आहे.
या देखाव्याचे उदघाटन आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांचे हस्ते उदघाटन करण्यात करण्यात आले. लक्षवेधी देखावा ठरल्याने परिसरातून भाविक, भक्त, नागरिकांनी देखावा पाहण्यास गर्दी केली. या उदघाटन प्रसंगी मंडळास शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, पूणे जिल्हाध्यक्ष मल्हार भाऊ काळे आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिन महाराज शिंदे, अविनाश राळे यांनी सद्दिच्छा भेट देऊन मंडळाचे कार्याचे कौतुक केले.
या प्रसंगी मंडळाने विकृत मनोवृत्तीची हि गुन्हेगारी रोखूया । आणि सभ्य सुसंस्कृत सुरक्षित पिढी घडवुया ।। असा या देखाव्यातून संदेश दिला. मंडळ दार वर्षी सामाजिक शैक्षणिक, आरोग्य विषय कार्य करीत भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करीत असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक विनोद पगडे यांनी सांगितले.
या उदघाटन प्रसंगी विनोद पगडे, माऊली महाराज सुतार, अप्पा पगडे, नारायण घोलप, संतोष कानडे, दयानंद मंजुळे, बाळासाहेब मुलगिर, ज्ञानेश्वर काळकर, नितीन थोरवे, सागर जगताप, महेश चव्हाण, पोपट म्हेत्रे आदी कार्येकर्ते, सभासद उपस्थित होते.