बोपोडी : पुणे शहरातील नामवंत विधीतज्ञ, बोपोडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी प्रिय सर, संघर्षशील व्यक्तिमत्तव गोरगरिबांचे मदतनीस ऍड. रमेश पवळे सर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे साध्या पद्धतीने बोपोडी येथील त्यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्ते करीमभाई तुर्क प्रमुख उपस्थिती मा. आमदार मोहनदादा जोशी, मा. आमदार दीप्तीताई चौधरी, यांच्या हस्ते सरांचा सन्मान करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरांना शुभेच्छा दिल्या यात प्रामुख्याने मा, नगरसेवक कैलास गायकवाड, ऍड. नंदलाल धीवार, चंद्रशेखर कपोते, कमलताई गायकवाड, ज्योतीताई परदेशी, अरुणाताई चेमटे, सुंदरताई ओव्हाळ, कांताताई ढोणे, शोभना पनीकरण, दिलशाद अत्तार, रमाताई भोसले,
संतान पिल्ले, संगीता कांबळे, कल्पना शंभरकर, मोनिका पठारे, शोभा आरुडे, करीम शेख,विजय जाधव, इंद्रजित भालेराव, शशिकांत पांडुळे, राजेंद्र भुतडा, विशाल जाधव, प्रशांत टेके, अनिल भिसे,विजय जगताप, एच एम शिंदे,
सादिकभाई शेख, अशोक गायकवाड, रवींद्र कांबळे, ऍड. विठ्ठल आरुडे, मयुरेश गायकवाड, विनोद सोनावणे, शशिकांत ओव्हाळ, महंमद शेख, सिद्दीक पठाण, रवी नायर, मिलिंद माने, नंदू कांबळे, नंदू भालेराव,भगवान कांबळे,खरात, सावंत, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी मराठवाडा मिलिंद महिला संघाच्या वतीने सरांना अध्यक्षा चारुशीला भालेराव यांच्या हस्ते धम्म ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी करुणाताई गायकवाड, कांताताई ढोणे, सूर्यवंशी मावशी उपस्थित होते. निर्मिती स्वयंरोजगार समिती च्या वतीने नाईकचाळ बोपोडी येथे केक कापून सरांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी गौरी कांबळे , संगीता कांबळे, प्रेरणा साळवे, अंतरा कांबळे, मुस्कान शेख उपस्थित होते. शुभेच्छा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी आभार महेंद्र कांबळे यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब शेडगे, संदीप भिसे, उमेश कांबळे, अशोक कांबळे इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले.