पुण्यातील आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे संगमवाडी
समाधी स्थळी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी केले अभिवादन,

पुण्यातील आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे संगमवाडी
समाधी स्थळी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी केले अभिवादन,
लहुजींच्या क्रांती भूमीतील पवित्र मातीचा कलश भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते पूजन करण्यात आला.
14 नोव्हेंबर ला लहुजींच्या जयंतीला स्मारक भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी माननीय पंतप्रधान मोदी यांना विनंती चे निवेदन जे. पी. नड्डा यांना स्मारक समितीच्या वतीने देण्यात आले.
देशभरामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभर नारा देऊन, अपनी माटी अपना देश हा देशभर . राबवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी जे.पी.नड्डा यांचा दौरा हा नियोजित होता.
क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या भूमीवरील पवित्र मातीचा कलश दिल्लीमध्ये होत असलेल्या शाहिद जवाणांच्या स्मारका साठी महाराष्ट्रातील क्रांती भूमितील पवित्र मातीचा कलश जे.पी.नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष यांना स्मारक समितीच्या वतीने सुपूर्द करण्यात आला.
राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत जे. पी. नड्डा यांना गुरुवर्य लहुजींची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,माजी मंत्री दिलीप भाऊ कांबळे,आमदार सुनील भाऊ कांबळे, आमदार सिद्धार्थ शिरोळे,माजी आमदार जगदीश मुळीक,आद्य क्रांतीगुरु लहुजी वास्ताद स्मारकाचे अध्यक्ष अशोक लोखंडे, समितीचे सदस्य,क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख शंकर भाऊ तडाखे आणि मातंग समाजामधील सर्व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
× How can I help you?