औंध भागातील जय गणेश मित्र मंडळ आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या वतीने यंदाच्या गणेश उत्सवात कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने महिलांचा आवडता कार्यक्रम घरकुल मिनिस्टर भाऊ पाटील, पडाळ वस्ती येथे आयोजित करण्यात आला होता.
गेली दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमा अंतर्गत संगीत खुर्ची, लहान मुलां मुली साठी लिंबूचमचा तसेच नेत्र शिबिराचे आयोजन आधारस्तंभ चिटणीस पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शशिभाऊ पांडुळे यांनी केले होते.
या प्रसंगी श्री गणेश आरती साठी राष्ट्रवादी काँग्रेस चे जयंत पाटील , मा. नगरसेवक श्रीकांत पाटील, प्रमुख उपस्थिती आमदार दीप्तीताई चौधरी, काँग्रेस जेष्ठ कमलताई गायकवाड, सुवर्णाताई पांडुळे, स्वाती जाधव,काँग्रेस नेते इंद्रजित भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेस चे सादिकभाई शेख, अनिल भिसे, राजेंद्र भुतडा, इत्यादी उपस्थित होते.
संगीत खुर्ची प्रथम क्रमांक सान्वी जाधव, द्वितीय प्रीती जांगली, मुले प्रथम क्रमांक वेदांत गायकवाड, कुणाल जांगली, लिंबू चमचा प्रथम क्रमांक श्रुती गुरव, संगीत खुर्ची मुली प्रथम क्रमांक पुर्वा सकटे, द्वितीय क्रमांक तेजश्री पवार, महिला नृत्य स्पर्धा प्रथम क्रमांक स्वाती जाधव, या सर्व विजेत्यांना सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई पांडुळे आणि उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विशेष गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
घरकुल मिनिस्टर म्हणून पैठणी आणि मुकुट पूजा जगताप यांना सुवर्णाताई पांडुळे, शशिकांत पांडुळे आणि इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते देण्यात आले.