आळंदी (मल्हार भाऊ काळे) : येथील गणेश विसर्जन मिरवणुकांचे खास आकर्षण ठरला तो धर्मराज मित्र मंडळाचे केरळ सांस्कृतिक नृत्य, हरिनामाचा गजर ,ढोल-ताशाचा दणदणाटात भक्तीमय जयघोषात आळंदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. यासाठी गणेश भक्तांनी आळंदी नगरपरिषद आणि श्री आळंदी धाम सेवा समिती, आळंदी शहर शिवसेना यांनी विकसित केलेल्या कृत्रिम सहा केंद्रात गणेश विसर्जन कुंडात ठिक ठिकाणी मोठी गर्दी केली.
आळंदी नगरपरिषदेने यावर्षीही इंद्रायणी नदी घाट श्रींचे गणेश विसर्जन करण्यास पूर्ण पणे बंद केला होता. इंद्रायणी नदीचे प्रदूषण होऊ नये यासाठी दक्षता उपाय योजनेचा भाग म्हंणून नदी घाटाचे दुतर्फ़ा मूर्ती विसर्जन केंद्र उभारल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले. नदी घाटावर गणेश भक्तांनी नगरपरिषदेचे आवाहनाला प्रतिसाद देत हजारो मूर्ती दान करीत आळंदीतील इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्यास सहकार्य केल्याबद्दल आळंदी नगरपरिषद प्रशासनाने आळंदी पोलीस, वाहतूक पोलीस, विविध सेवाभावी संस्थांसह गणेश भक्त आणि नागरिकांचे श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी आभार मानले.
आळंदी शहर परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी ६ ठिकाणी केलेल्या मूर्ती दान स्वीकार केंद्रास प्रतिसाद देत आरती नंतर प्रतीकात्मक पाण्याचे मोठ्या हौद्यात श्रींचे विसर्जन करीत प्रशासनांकडे मूर्ती दान केल्या.