(आळंदी मल्हार भाऊ काळे)सेवेच्या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. रविवारी दिनांक १ ऑक्टोबर २०२३ रोजी संपूर्ण देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून आळंदीत इंद्रायणी नदी घाटावर सकाळी १० वाजता स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. यात विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने तसेच आळंदी नगरपरिषद आणि चऱ्होली व केळगाव ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यक्षेत्र ही स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे
या अभियान मध्ये सर्व सेवाभावी संस्थांसह आळंदी जनहित फाउंडेशन, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री आळंदी धाम सेवा समिती, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, नेचर फाऊंडेशन , दक्षता सेवा फाऊंडेशन, सीडीसीव्ही आदी संस्थांचे माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सर्व नागरिक, वारकरी यांनी या ” स्वच्छता ही सेवा ” या उपक्रमात सहभागी व्हावे.
आपला माणूस श्री अर्जुन मेदनकर पत्रकार कार्याध्यक्ष नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, आळंदी जनहित फाऊंडेशन
स्थळ : इंद्रायणी नदी घाट, वेळ : सकाळी १० वाजता, रविवार दि. १ ऑक्टोबर २०२३