आळंदीतील  ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर म्हणजेच पोलिस चौकी ते आळंदी ग्रामीण* *रुग्णालयपर्यंतच्या रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी बसू नये असा निर्णय*

*आळंदी :मल्हार भाऊ काळे:मार्च (2023) महिन्यात तत्कालीन तहसीलदार प्रशासकीय आधिकारी यांच्या उपस्थितीत एका बैठकीत झाला होता. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या त्या रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर इ.विक्रेते यांवर कारवाई केली जाणार असेही त्यावेळी ठरले होते.
तसेच या बैठकीत आळंदी ग्रामीण रुग्णालय अधीक्षक उर्मिला शिंदे यांनी आठवड्यात ग्रामीण रुग्णालयात किती रुग्ण येतात? तसेच रुग्णांबरोबर जे नातेवाईक असतात त्यांची आकडेवारी त्यावेळी सांगितली होती. रुग्णवाहिकेतून गर्भवती महिला प्रसूतीच्या वेळी ग्रामीण रुग्णालयात किती आणल्या जातात, यासाठी येथील रस्ता का अतिक्रमण मुक्त असावा? याची सविस्तर माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती.

या बैठकीत रस्त्यावरील अतिक्रमण मुक्ततेसाठी अतिक्रमण विभागातील व्यक्ती सदैव तत्पर रहावा,

पालिकेतील अतिक्रमण विभागातील व्यक्तीच कारवाईसाठी हजर नसतात. शेतकरी भाजी विक्रेते वर्गासाठीसुद्धा जागेची व्यवस्था करावी. ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर भाजी मंडई बसते यावर या बैठकीत ठोस निर्णय घ्यावा. अशी मागणी डी. डी. भोसले पाटील यांनी केली होती.
परंतु, गेल्या काही दिवसापासून परत ग्रामीण रुग्णालयाच्या या रस्त्यावर सकाळी, सायंकाळी पुन्हा काही भाजी विक्रेते  बसल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या
Service médical à domicile de Medici Generici à Rome
Service médical à domicile de Medici Generici à Rome
Notre équipe fournit un service de soins de santé à domicile, garantissant professionnalisme et confort pour les patients à Rome.
मेन गेटच्या शेजारीच दोन्ही बाजूने भाजी विक्रेते बसल्याचे चित्रही दिसून येत आहे.

तर त्या ग्रामीण रुग्णालयाच्या रस्त्यावर इतर ठीक ठिकाणी भाजी विक्रेते, हातगाडी भाजी विक्रेते भाजी विक्री करताना दिसून येत आहेत. यामुळे नगरपालिकेच्या कारवाईचा धाक तेथील रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर राहिलेला नाही. अशी चर्चा गावात रंगत आहे.
तसेच या रस्त्यावर दुचाकी वाहने ही या रस्त्यावर पार्किंग करतात. भाजी विक्रेते तेथे भाजी विक्री करता बसल्याने व वाहने पार्क केल्याने ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता अरुंद होतो. रुग्णवाहिका या रस्त्यावर वरून ये-जा करत असते. तिला त्या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी रस्ता अरुंद राहत आहे.
× How can I help you?