राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमाचे आयोजन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमाचे आयोजन पिंपळे गुरव, जुनी सांगवी, सांगवीसह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात आले होते. ‘एक तास स्वच्छतेच्या श्रमदानासाठी’ या कार्यक्रमात अनेक नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सहभागी होताना या परिसराची स्वच्छता केली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मनापासून योगदान दिले, त्या सर्वांचे मनापासून आभार मानले. तसेच यापुढील काळात आपण आपला सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन उपस्थित नागरिकांना केले.

यावेळी आमदार अश्विनी जगताप, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, सागर अंघोळकर, माजी नगरसेविका उषा मुंढे, शारदा सोनावणे,  वैशाली जवळकर, माजी स्वीकृत सदस्य महेश जगताप, शशिकांत दुधारे, राहुल जवळकर, संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण फिरके, संघाचे पदाधिकारी, अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, पिंपळे गुरव प्राथमिक, माध्यमिक प्रशालेचे विद्यार्थी या सर्वांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला.

× How can I help you?