पुणे : पुण्यात एका कार्यक्रमात खा. शरदचंद्रजी पवार आले असता माजी नगरसेवक श्रीकांतजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन आम्ही सर्व कायम आपणा सोबत अशा भावना व्यक्त करीत अभिनंदन केले. आपला बहुमुल्य वेळ कार्यकर्त्यांना देऊन दिलखुलास पने कार्यकर्त्यांशी बातचीत करीत कार्याचा आढावा घेत साहेबांनी चर्चेस वेळ दिल्या बद्दल प्रत्येकाने त्यांचे मनोमनी आभार मानले. या सदिच्छा भेटीत शशिकांत पांडुळे, सादीकभाई शेख, सतीश शहा, प्रशांत बहिरट, दिलशाद अत्तार, सुवर्णाताई पांडुळे, स्वाती जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भटक्या विमुक्त यांनी काटे लॉन्स दापोडी येथे खा. शरदचंद्रजी पवार यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या वेळी पवार साहेबां चे स्वागत समस्त ग्रामस्थ बोपोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने इलायची पुष्पहार श्रीकांतजी पाटील यांच्या हस्ते देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी शशिकांतभाऊ पांडुळे, वसुधाताई निरभवने, उपस्थित होते.