सांगली बेडग गाव येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या लाँग मार्च ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर च्या वतीने पाठींबा
सांगली बेडग गाव येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या कमानी साठी सांगली ते मुंबई मंत्रालय पर्यंत पायी लाँग मार्च निघाला आहे त्या लाँग मार्च ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहर च्या वतीने किवळे देहूरोड येथील विहार येथे त्यांना पाठींबा देण्यात आला व रोख रक्कम ११ हजार मदत करण्यात आली प्रसंगी शैलेंद्र चव्हाण, विशाल भाऊ शेवाळे, महेंद्र कांबळे, महिपाल वाघमारे, वसंत बनसोडे, लियाकत शेख, भगवान गायकवाड, बाबासाहेब तुरुकमारे,अतुल भालेराव, रमेश तेलावडे, शांतीनाथ चव्हाण, रोहित कांबळे, इकबाल खान उपस्थित होते.