स्वर्गीय माजी खासदार वसंतराव चव्हाण यांनी स्थापना केलेली विद्यार्थी सेवा संघा ची 56 व्या वर्षात पदार्पणाने ही अभिमानाची गोष्ट माजी महापौर प्रशांत जगताप,
विद्यार्थी सेवा संघाचे 56 वे वर्धापन दिनानिमित्त कॅम्प येथे नेहरू मेमोरियल हॉलमध्ये उत्तरणीय झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि त्यांना पारितोषिक वितरण समारंभ पुण्याचे माजी महापौर व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या कार्यक्रमांमध्ये समाजातील ज्येष्ठ
दांपत्य यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी प्रशांत जगताप म्हणाले स्वर्गीय माजी खासदार वसंतराव चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेली विद्यार्थी सेवा संघाचे 56 वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे ही खूप मोठी अभिमानाची बाबआहे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पारितोषिक चांगली दिशा देण्याचे काम केले आणि त्याचे वारसा त्यांचे पुत्र कनव चव्हाण पुढे चालवत आहे ,संस्थेच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शाळा कॉलेज च्या फी साठी आणि त्यांच्या अन्य कारणांसाठी विद्यार्थी सेवा संघ ही संस्था अग्रेसर आहे ही खूप मोठी समाधानाची बाब आहे मुलांना व्यावसायिक शिक्षण द्या मुलांन मध्ये आत्मविश्वास तयार करा, मी माझ्या आई वडिलांचे श्रम घालवणार नाही,
मी आत्महत्या करणार नाही, मुले खूप महत्त्वकांक्षी झाले आहे ,मुलांच्या हातात सतत मोबाईलचे व्यसन झाले त्यामुळे मानसिक संतुलन बिघडत चालली आहे ,असे न होता चुकीच्या मार्गात न जाता चांगले विचार निवडा असे मत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमीर शेख काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एन एस यु आय, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष सचिन मथुरावाला ,राजा वाल्मिकी राकेश बेद, विद्यार्थी सेवा संघाचे अध्यक्ष विनोद निनारीया, उपाध्यक्ष रवी भिंगानिया ,प्रमोद कोटीयांना, दीपक निनारीया, युग फाउंडेशन चे पुणे शहर अध्यक्ष कुणाल जेधे, गोपी कसोटे, कुणाल करोते, विशाल चव्हाण, देविका घोसरे, प्रतीक निनारीया, अक्षय चरण, राखी चंडालिया, आदि यावेळी उपस्थित होते, कार्यक्रमाचे आयोजन कनव वसंतराव चव्हाण उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वास चव्हाण यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धांत नारायण सारवान यांनी मानले