येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने परंपरांचे पालन करीत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त श्रींचा गाभारा विविध रंगी आकर्षक फुलांचे सजावटीने सजविण्यात आला होता. यामुळे श्रींचे वैभवी रूप खुलले. श्रींचे दर्शनास भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होती.
मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच ग्रंथ दिंडी हरिनाम गजरात झाली. पारायण, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. अशी माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली. विविध धार्मिक मठ, मंदिर, धर्मशाळा येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे माध्यमातून उत्साहात साजरी झाली. मंदिरात श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक माऊली वीर त्यांचे हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले. श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ५ ऑक्टोबर पर्यंत होत आहे. येथील स्वकाम सेवा मंडळाचे वतीने माऊली मंदिरातील ध्यान कक्षात ज्ञानेश्वरी जयंती निमित्त एक माळ जप उपक्रमाचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यास भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. जपा नंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. स्वकाम सेवा मंडळाचे संस्थापक डॉ. सारंग जोशी, अध्यक्ष सुनील तापकीर, महिला विंग अध्यक्षा आशा तापकीर, मनसुख लोढा आदी स्वकाम सेवकांनी या उपक्रमाचे यशस्वीतेस परिश्रम घेतले.
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी दिंडीचे हरिनाम गजरात आयोजन
श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त येथील विविध सेवा भावी संस्थांचे वतीने ग्रंथ दिंडी हरिनाम गजरात झाली. यात श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठाण, श्री आळंदी सेवा धाम समिती आदींचा सहभाग होता. आळंदी शहरात श्री ग्रंथराज धन्यानेश्वरी ग्रंथ दिंडीने हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा तसेच माऊली मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी आळंदी संस्थांचे वतीने ग्रंथ दिंडीचे स्वागत व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले.
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती दिनी आळंदीत ग्रंथ दिंडी मिरवणूक
श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, महावैष्णव वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा, मंदिर प्रदक्षिणा करीत झाली. नरसिव्ह सरस्वती स्वामीं महाराज मठ येथून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून झाली. यावेळी वारकरी भाविकांनी तसेच विद्यार्थी यांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेत टाळ, मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी मिरवणूक पार पडली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महत्त्व ज्ञानेश्वरी जयंती cipf-es.org निमित्त आपल्या पवित्र वाणी मधून सर्व उपस्थित दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांना प्रबोधन केले. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, श्री आळंदी सेवा धाम समिती, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री महावैष्णव वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीने दिंडीचे नियोजन करण्यात आले. दिंडीत आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष संयोजक उद्योजक राहूल चव्हाण,पूणे जिल्हाध्यक्ष मल्हार भाऊ काळे नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, एम डी पाखरे, रामचंद्र महाराज सारंग, ज्ञानेश्वर महाराज जाधव, नितीन ननवरे, समाधान सोनवणे, भागवत काटकर, बाबासाहेब भंडारे, राज कदम, हिरामण तळेकर, रविंद्र महाराज कुमकर, पृथ्वीराज कऱ्हाले, सचिन शिंदे यांनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. गोपाळपुरातील श्री ज्ञानेश्वरी मंदिरात सुद्धा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.