संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ज्ञानेश्वरी जयंती साजरीआळंदी

आळंदी पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन करण्यात आले.
या निमित्त पहाटे मंदिरात काकड आरती, माऊलींची महापूजा, आरती, नैवेद्य वाढविण्यात आला. सकाळी दहा ते बारा या वेळेत ह. भ.प. चंद्रकांत महाराज खेडकर यांची कीर्तन सेवा झाली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका महिला भजनी मंडळ यांची भजन सेवा रुजू झाली. नित्य नैमित्तिक हरिपाठ, आरती झाली. गेले सात दिवस ह. भ.प. साहेबराव शेळके व चंद्रकांत ढमाले यांची यावेळी श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त पारायण सेवा झाली. यावेळी कीर्तनकार ह. भ.प. चंद्रकांत महाराज खेडकर यांचा सत्कार अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर व उद्योजक हरिष चत्तार यांचे हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
.

यावेळी ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, ह. भ.प. रमेश घोंगडे, ह. भ.प. दिनकर माळवे, ह. भ.प. विठ्ठल महाराज वानखेडे, साहेबराव काशीद, चंद्रकांत मोरे आदी उपस्थित होते. दिघी येथी उद्योजक हरिष चत्तार यांचे तर्फे भाविकांना अन्नदान सेवा रुजू करण्यात आली. प्रथा परंपरांचे पालन करीत मंदिरात श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती साजरी करण्यात आली.

× How can I help you?