ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी दिंडीचे हरिनाम गजरात आयोजन

श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त येथील विविध सेवा भावी संस्थांचे वतीने ग्रंथ दिंडी हरिनाम गजरात झाली. यात श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठाण, श्री आळंदी सेवा धाम समिती आदींचा सहभाग होता. आळंदी शहरात श्री ग्रंथराज धन्यानेश्वरी ग्रंथ दिंडीने हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा तसेच माऊली मंदिर प्रदक्षिणा झाली. यावेळी आळंदी संस्थांचे वतीने ग्रंथ दिंडीचे स्वागत व्यवस्थापक माऊली वीर यांनी केले.


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती दिनी आळंदीत ग्रंथ दिंडी मिरवणूक
श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, महावैष्णव वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी हरिनाम गजरात नगरप्रदक्षिणा, मंदिर प्रदक्षिणा करीत झाली. नरसिव्ह सरस्वती स्वामीं महाराज मठ येथून ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन करून झाली. यावेळी वारकरी भाविकांनी तसेच विद्यार्थी यांनी ज्ञानेश्वरी डोक्यावर घेत टाळ, मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी मिरवणूक पार पडली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महत्त्व ज्ञानेश्वरी जयंती निमित्त आपल्या पवित्र वाणी मधून सर्व उपस्थित दिंडीत सहभागी झालेल्या भाविकांना प्रबोधन केले. श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, श्री आळंदी सेवा धाम समिती, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री महावैष्णव वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या वतीने दिंडीचे नियोजन करण्यात आले.

दिंडीत आळंदी धाम सेवा समिती अध्यक्ष संयोजक उद्योजक राहूल चव्हाण, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, एम डी पाखरे, रामचंद्र महाराज सारंग, ज्ञानेश्वर महाराज जाधव, रविंद्र महाराज कुमकर, पृथ्वीराज कऱ्हाले, सचिन शिंदे, नितीन नणवरे, समाधान सोनवणे, रवींद्र जाधव, बाबासाहेब भंडारे, भागवत काटकर, राज कदम यांनी परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. गोपाळपुरातील श्री ज्ञानेश्वरी मंदिरात सुद्धा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

× How can I help you?