श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेस वारकरी साहित्य सुपूर्द६० साधक मुलांना वारकरी पोशाख भेट

येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेस वारकरी साहित्य सुपूर्द करण्यात आले. यात टाळ, मृदुंग, विना, हार्मोनियम तसेच वारकरी विद्यार्थ्याना पोशाख देऊन महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ अध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्व. संकेत कुऱ्हाडे पाटील यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकीतून वारकरी साहित्य सुपूर्द करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष व श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विलास तात्या बालवडकर यांच्या तर्फे श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांस कायम सहकार्य केले जाते.


स्व. संकेत कुऱ्हाडे यांच्या स्मरणार्थ विलास तात्या बालवडकर यांनी त्यांच्या आठवणी सतत स्मरणात राहाव्यात या निमित्ताने त्याच्या नावाने नामघोष व्हावा म्हणून संस्थेला टाळ, मृदुंग, विना, हार्मोनियम व शालेय ६० मुलांना वारकरी पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले. या निमित्त सकाळी नऊ ते बारा या वेळेत संगीत भजन, दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी, सर्व मुलांसह वारकरी भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले


समाजात अनेक प्रकारची व्यक्तिमत्त्व असतात. मात्र विलास तात्या बालवडकर हे एक आगळे आणि वेगळे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा कोणताही कार्यक्रम असला तरी वारकरी सांप्रदायाच्या वसा आणि वारसा घेऊन आपण काहीतरी समाजाला देणे लागतो या भावनेतून सतत वारकरी आणि श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेसाठी मदत करत असतात. समाजाकडे भरपूर आहे पण देण्याची दानत नसते. विलासतात्या बालवडकर हे सर्व गुण संपन्न व्याव्क्तीमत्व आहे. विविध कार्यक्रमांना ते नेहमी मदत करीत असतात.

समाज सेवी संस्थेस , मंदिरांना, ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आदी संस्थाना सेवाभावी वृत्तीने सहकार्य करीत असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. अधिकमास सिद्धबेट सप्ताहात देखील मोठे अन्नदान आणि ज्ञानदान सप्ताह स्व. दशरथ कोंडीबा बालवडकर यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह हिंदू परंपरे नुसार झाला. पूरग्रस्तांना मदत, कोरोना काळात साडेसहाशे कुटुंबांना किराणा व भाजीपाला वाटपाचे काम करून गरीब गरजू समाजासाठी त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. महात्मा गांधी जयंती सप्ताह स्व. संकेत कुऱ्हाडे यांच्या स्मरणार्थ संस्थेस वारकरी संप्रदायास आवश्यक त्या वस्तू, साहित्य देत वारकरी मुलांना वारकरी पोशाख देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी चंद्रकांत कुऱ्हाडे, भरत कुऱ्हाडे, हेमंत कुऱ्हाडे, विलासतात्या बालवडकर, मोहन महाराज शिंदे , रामचंद्र महाराज सारंग, कृष्ण महाराज कोलते, रवींद्र महाराज कुमकर, पवन बागल, मृदंग वादक कुमारी कल्याणी शिंदे, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेतील साधक, आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी झालेल्या भजनास उपस्थितांची दाद मिळाली.

× How can I help you?