पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित वरती सल्लागार पदी ॲड. संजय सावंत (पाटील) यांची निवड..

बातमी – नुकतीच सोमवार दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित संचालक मंडाळाची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक वरती कायदेशीर सल्लागार पदी ॲड. संजय सावंत (पाटील) यांची आधिकृतपणे निवड करण्यात आली.

ॲड. संजय सावंत हे गेली अनेक वर्षे पुणे जिल्हा व सञ न्यायालयात अनेक वर्षे वकीली व्यवसाय करत आहेत. प्रामुख्याने फौजदारी, दिवाणी तसेच कौटुंबिक क्षेत्रात महाराष्ट्रातील विविध न्यायालयात काम करत आलेले आहे. सामाजिक बांधिलकी जपत आजपर्यंत अनेक पिडीत महिलांना सुध्दा कायदे विषयक मदत त्यांनी केलेली आहे. यासोबतच खरेदी – विक्री व बँक संदर्भातील सर्व प्रकारचे दस्ताऐवज दुय्यम निंबधक यांच्या समोर नोंदवून घेणे. या सर्व सामाजिक व वकीली व्यवसायातील कामाची दखल घेऊन सर्व बँक संचालक कमिटीने ॲड. संजय दत्ताञय सावंत (पाटील) यांना पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित वरती कायदा (विधी) विभाग मध्ये वकील पँनेल वरती कायदेशीर सल्लागार म्हणून निवड केलेली आहे.

× How can I help you?