नितु सिंग यांना “माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार” जाहीर


आळंदी ( मल्हार भाऊकाळे): येथील सामाजिक कार्यकर्त्या नितु सिंग यांना जळगांव येथील “आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थे”च्या वतीने
“माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. नितु सिंग या नेहमी महिलांना विविध प्रकारच्या योजना, महिला बचत गट, महिलांचा विकास, विविध योजना उपक्रम या बाबत माहिती देणे, महिलांना आरोग्य संबंधित प्रबोधन, आरोग्य शिबिरे, गरीब गरजू मुला मुलींना तसेच होतकरू महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यास प्रयत्न करत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत संस्था अध्यक्ष फारूक शाह नौमानी यांनी नितु सिंग यांना पुरस्कार जाहीर केला आहे.नितु सिंग यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर नातेवाईक, मित्र मंडळी तसेच विविध सेवाभावी संस्था, पदाधिकारी यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचेसह नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, श्री आळंदी धाम सेवा समिती, श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था आदींनी अभिनंदन केले आहे.

× How can I help you?