आळंदि ( मल्हार भाऊ काळे)
आळंदी दि. 12 तीर्थक्षेत्र आळंदी येथील देहूफाटा या चौकात असणारे श्री संतकृपा प्रवासी वाहतूक संघ, शाखा आळंदीचे अध्यक्ष संतोष ( नाना) गुंड हे आपण स्थापन केलेल्या दहा रिक्षांसाठी स्टॅन्ड वरील सर्व सदस्यांना शिस्तीचे पालन करण्यास भाग पाडत असून, नुकतेच येथील वाहतूक विभागाकडून बॅरिगेट्स आणून त्या ठिकाणी रस्त्याच्या एका साईटला ठेवून आतील भागात आपल्या रिक्षा लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सुरळीत झाली आहे, पादचाऱ्यांचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.
तीर्थक्षेत्र आळंदी येथे पी. एम. पी. एम. एल. बस स्थानक, मरकळ रोड,(संतोषी माता मंदिराजवळ), वडगाव घेनंद (भैरोबा चौक), मुख्य चाकण चौक, केळगाव रोड, (इंद्रायणी हॉस्पिटल नजीक)
आळंदी मध्ये असे एकूण पाच ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड असून, प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळून व कोणत्याही प्रकारचा वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेऊन सर्व रिक्षा स्टॅन्ड चालकांनी आपला रिक्षा व्यवसाय सुरळीत व प्रामाणिकपणे करावा जेणेकरून आपल्यापासून कोणालाही त्रास होणार नाही असे धोरण अवलंबावे व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे हाच एक संदेश संतोष ( नाना) गुंड यांनी दिला असल्याचे बोलले जात आहे.
यावेळी अध्यक्ष संतोष (नाना) गुंड, उपाध्यक्ष संदीप कुरुंद, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण (नाना) बवले, शिवसेना नेते संदीप पगडे, एम.डी. पाखरे,नंदू शेळके, मिलिंद गंगावणे, जलबा भाले, अजय घोडके,सोपान पवळे,गणेश घुटकुले, प्रदीप देऊळकर, सुरेश उंडे, प्रकाश धांडे व रियाज शेख.आदी यावेळी उपस्थित होते.