वाहतूक कोंडीतून मुक्तता साठी दिघी-आळंदी वाहतूक पोलिसांनी रिक्षा स्टॅन्ड साठी बॅरिकेट्स दिले

आळंदी(मल्हार भाऊ काळे)दिघी आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी देहू फाटा येथे असणाऱ्या रिक्षाधारकाना चार बॅरिकेट्स देऊन आपल्या रिक्षा एका लाईनीत एका कडेला लावाव्यात असा सूचना देऊन आळंदी शहरांमध्ये पाच ठिकाणी रिक्षा स्टॅन्ड आहे त्या सर्व रिक्षाच्या स्टैंड वर बॅरिकेट्स देऊन सर्व रिक्षा स्टॅन्ड धारकांना योग्य रीतीने रस्त्याच्या एका बाजूला बॅरिकेट्स लावून आपापल्या रिक्षा व्यवसाय करण्यास सांगितले आहे जेणेकरून रस्त्यावरती ये जा करणाऱ्या इतर वाहनांना फुटपाथ वरती चालणाऱ्या आम जनतेला रिक्षा धारकांना कडून कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये याची काळजी सर्व रिक्षा स्टॅन्ड अध्यक्ष यांना घ्यायला सांगितले आहे व शिस्तीने आपला आपला व्यवसाय करावा स्टॅन्ड व्यतिरिक्त ठिकाणी गाड्या लावल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे दिघी आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सांगितले

× How can I help you?