आळंदी दि. 12 ( वार्ताहर मल्हार भाऊ काळे): तीर्थक्षेत्र आळंदी येथे चनुकताच गणेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण इंद्रायणी नदीवर गणेश विसर्जनास बंदी घालण्यात आली होती. त्या कालावधीत एकाही गणेश मूर्तीचे इंद्रायणी नदीत विसर्जन करण्यात आले नव्हते.
परंतु नवरात्र उत्सव तोंडावर येऊन ठेपला असून, गेली चार-पाच दिवसांपासून इंद्रायणी नदीवर आळंदीकरांसह परिसरातील नागरिक आपल्या घरातील गोधड्या व इतर कपडे धुण्यासाठी इंद्रायणी नदीवर येत आहेत. त्यामुळे संपूर्ण नदीवर गोधड्या वाळत घालण्याचे चित्र आहे. या ठिकाणी पालिकेचा कर्मचारी येऊन सर्वांना सूचना देत आहे की, इंद्रायणी नदीवर गोधड्या धुण्यास बंदी आहे.तरी देखील कोणीही ऐकायला तयार नाही राजेरोसपणे गोधड्या धुऊन इंद्रायणीचे पावित्रे नष्ट करण्याचे काम ही मंडळी करीत आहे तरी संबंधितांना पालिकेने वेळीच आळा घालावा अशी मागणी आहे.
फोटो ओळ. इंद्रायणी नदी घाट (ता. हवेली): येथे नियमित मोठ्या प्रमाणावर गोधड्या धुतल्या जात आहेत त्यामुळे इंद्रायणी नदी रंगीबेरंगी दिसत आहे.
छायाचित्र : मल्हार भाऊ काळे आळंदी देवाची.