घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त नाना पेठ येथील डीसीएम सोसायटीच्या महात्मा ज्योतिबा फुले मुलींच्या शाळेत सुंदर सजावट करून रांगोळी काढून देवीची मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भोंडल्याचे आयोजन केले. या या कार्यक्रमाला स्प्रेड हॅप्पीनेस फाउंडेशन चे संस्थापक सौम्या महापात्रा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थिनींना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना देवीच्या नऊ रूपांचे महत्त्व सांगण्यात आले या कार्यक्रमाला डीसीएम सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे. काजल शेवाळे. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा भोसले. आनंद महापात्रा. मुलींच्या शाळेच्या पर्यवेक्षिका मदने नागरदेवी. तुषार मोहिते. प्रणिती सावंत. योगिनी बागडे. इंद्रजीत सकट. किरण मोहिते. विशाल पवार. शेखर चक्रनारायण. विनिता ब्राह्मणकर. कल्याणी महाजन आदि यावेळी उपस्थित होते