श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती साजरी,वारकरी साधकांनी केले वाचन

आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत शालेय शिक्षणा समवेत वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेणाऱ्या वारकरी साधक विद्यार्थ्यानी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करून वाचन प्रेरणा दिनी वाचन संस्कृती जोपासली. एकाच वेळी सुमारे ७० साधक मुलं- मुलींनी या वाचन प्रेरणा दिनी श्री आळंदी धाम सेवा समितीचे वतीने आयोजित उपक्रमात भाग घेतला.

या प्रसंगी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे, श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रतिमेचे पूजन केले. यावेळी नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, सचिन महाराज शिंदे,
पूणे
जिल्हाध्यक्ष मल्हार भाऊ काळे महादेव पाखरे, दिनेश कुऱ्हाडे, ह. भ. प. कृष्ण महाराज कोलते, सारंग महाराज, रवी कुमकर, शशिकांत बाबर, नितीन ननवरे, साईनाथ ताम्हाणे आदींसह वारकरी साधक विद्यार्थी यांनी पुष्पांजली अर्पण केली.

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन व कार्य हे सर्वाना प्रेरणादायी असल्याचे श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांनी सांगितले. त्यांचे कार्याचा आढावा यावेळी त्यांनी मुलां समोर मांडला. यावेळी ग्रंथालयातील पुस्तके सर्व उपस्थित साधकांसह मान्यवरांना वाचनास उपलब्ध करून देत वाचन केले.

यावेळी वाचन प्रेरणा दिन उपक्रम राबविण्या मागील हेतू व उद्दिष्टे त्यांनी स्पष्ट केली. डॉ. अब्दुल कलाम यांचे जीवन कार्य व चरित्र याबाबत मार्मिक शब्दात प्रभावीपणे मांडणी केली. ती अतिशय प्रभावी व प्रेरणादायी होती. विद्यार्थ्यांसाठी डॉ. अब्दुल कलाम यांचे विचार, तत्त्वज्ञान उपयुक्त असून विद्यार्थ्यांना सदैव प्रेरणा देणारे आहे. त्यांचा त्याग, मेहनत, सेवा व कार्य सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला.

× How can I help you?