आळंदी भैरवनाथ पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा.


आळंदी ( मल्हार भाऊ काळे) : येथील श्री भैरवनाथ नागरी सह. पतसंस्था मर्यादित लांडेवाडी या वित्त संस्थेच्या आळंदी शाखेचा १७ वा वर्धापन दिन सामाजिक, धार्मिक, वित्त विषयक जनजागृती करून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त आळंदी शाखेत सत्यनारायण पूजा वेदमंत्र जयघोषात झाली. ग्राहकांचा बँके तर्फे सत्कार करण्यात आला.


यावेळी श्री भैरवनाथ नागरी सह. पतसंस्था मर्यादित शाखेचे संचालक राम गावडे, शाखाधिकारी प्रशांत हिंगे, शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर, युवा सेना जिल्हा प्रमुख धनंजय पठारे, शिवसेना आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण, तुकाराम महाराज ताजने, सहकार सेनेचे खेड उपतालुका प्रमुख शंकर घेनंद, आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, वेदपाठशाला अध्यापक मुकेश दंडवटे, संतोष थोरात, अविनाश राळे, महादेव पाखरे, सचिन महाराज शिंदे, नितीन ननावरे, दिलीप खळदकर, चंद्रकांत वहिले, संकेत वाघमारे, संतोष शेवाळे, अण्णासाहेब कदम, अँड सचिन काळे, यांचेसह बँकेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, संचालक, कर्मचारी वृंद तसेच आळंदी पंचक्रोशीतील ग्राहकांची मोठी उपस्थिती होती.
यावेळी शाखाधिकारी प्रशांत हिंगे यांनी बँकेच्या १७ वर्षाचे वाटचालीचा आढावा घेतला. श्री भैरवनाथ नागरी सह. पतसंस्था मर्यादित चे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे मार्गदर्शन खाली यशस्वी वाटचाल करीत आहे. १८ कोटी ठेवींची वाटचाल, कर्जवाटप १५ कोटी झाले असून ३७ लाख रुपयांचा शाखेस नफा झालाअसल्याचे सांगितले. संचालक राम गावडे, शिवसेना पुणे उपजिल्हा प्रमुख प्रकाश वाडेकर यांनी वर्धापन दिना निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी पतसंस्थेच्या वतीने ग्राहक, संचालक, ठेवीदार, कर्जदार तसेच पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

Recent Post

× How can I help you?