मुंबई -प्रतिनीधी, शिवशाही व्यापारी संघ मुंबई प्रदेश अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष योगेशजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेने अनिल पाटील यांची मुंबई सरचिटणीस पदी निवड संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणाहून जाहीर केली.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष अब्दुल शेख, मुंबई प्रदेश कार्याध्यक्ष योगेशजी घोरपडे, स्टीफन स्वामी,सागर पाटील,उमेश जंजवाळ, यांच्या सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
दरम्यान नवनियुक्त मुंबई प्रदेश सरचिटणीस अनिल पाटील यांनी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग,माता भगिनी, तृतीयपंथी भगिनींन,दिव्यांग बाधव व इतर प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सुचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.