पुणे महानगरपालिकेची उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्या संदर्भात जनजागृती मोहीम

बारणे कोठे येथील श्रमिक नगर येथील वस्तीतील नागरिकांना कचऱ्या संदर्भात घरोघरी जाऊन कचरा हा कचरा वेचक यांनाच द्या उगड्यावर इतरत्र न टाकता कचरा वेचक यांना घ्या. या संदर्भात जनजागृती मोहीम पुणे महानगरपालिका,पुणे यांनी हाती घेतली असून त्या अंतर्गत बारणे कोठी येथील क्रोनिक स्पॉट(GVP) कमी झाल्याचे आढळून आले आहे त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिका हा पूर्ण स्पॉट बंद करण्यासाठी पावले उचलत आहे. सदरील ठिकाणी मॉनिटरिंग करणे व त्या ठिकाणी रांगोळी काढण्यात आली. व नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेऊन उगड्यावर कचरा पडल्यामुळे होणारे आजार, कचऱ्याचे दुष्परिणाम या विषयी नागरिकांना माहिती देण्यात आली.या उपक्रमात सहभागी स्वच्छता निरीक्षक संजय तेरेखल बारणे कोठीचे मुकादम वीरेंद्र लालबिगे तसेच सामाजिक संस्था सोशल लॅब यांनी हा स्पॉट बंद कारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. सदरील भागात कचरा पडून न देण्यासाठी जनजागृती चे मोहीम सुजाण नागरिक म्हूणन पुणे नागरिकांनी हि मोहीम आपल्या हाती घ्यावी असे अहवान पुणे महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे. तरी सर्व नागरिकांनी आपला कचरा हा महानगरपालिकेने नेमून दिलेल्या कचरा वेचकांनाच द्यावा व आपले पुणे स्वच्छ, संदर्भ,हरित बनवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला सहकार्य करावे.

× How can I help you?