भाजप कार्यकर्त्यांना न्याय देणार ; पक्ष संघटना बळकट करा : – भाजप जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील भाजप

आळंदी:(मल्हार भाऊ काळे)

: आळंदीत भाजपा पक्ष संघटन कसे मजबूत होईल, पक्ष कसा वाढेल यासाठी प्रभावी सुसंवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांना जो पर्यंत संधी मिळत नाही तो पर्यंत पक्ष मोठा होणार नाही. आळंदीतील प्रमुख कार्यकर्त्यांचे माध्यमातून पंचक्रोशीत काम करून विश्वास निर्माण करा. भाजपचे माध्यमातून घर चलो अभियान राबविण्यात येणार आहे. मेरी मिट्टी, मेरा देश उपक्रम सर्वत्र प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले.


पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांचे अध्यक्षतेखाली भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी नूतन पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुट्टे पाटील मार्गदर्शन करताना बोलत होते. येथील साई मंगल कार्यालयात भाजपाची शहर कार्यकारिणी जाहीर करीत नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
यावेळी संजय घुंडरे पाटील, संदीप सातव, पांडुरंग वहीले, बंडूमामा पालवे सुरेश झोंबाडे, सचिन गिलबिले, सचिन काळे, गणेश गरुड, भागवत आवटे, रूपेश वाळके, संतोष गावडे, शंतनू पोफळे, ऋषिकेश पासलकर, सचिन सोळंकर, आकाश जोशी यांचे सह विविध सेलचे अध्यक्ष, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


भाजप आळंदी शहर कार्यकारिणी जाहीर
भारतीय जनता पार्टी आळंदी शहर कार्यकारिणीत शहराध्यक्ष किरण येळवंडे, कार्याध्यक्ष बंडूनाना काळे,
संघटन सरचिटणीस ज्ञानेश्वर बनसोडे, सरचिटणीस सदाशिव साखरे, कोषाध्यक्ष सुरेशनाना झोंबडे, उपाध्यक्ष
प्रमोद बाफना, संकेत वाघमारे, ॲड. सचिन काळे, विकास पाचुंदे, मोर्चा व आघाडी अध्यक्ष यात युवा मोर्चा अध्यक्ष वासुदेव तुर्की, महिला मोर्चा अध्यक्ष संगीता फपाळ, ओबीसी आघाडी अध्यक्ष भागवत काटकर,
व्यापारी आघाडी अध्यक्ष आनंद वडगावकर, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष योगेश प्रताप सिंह, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष‌ प्रथमेश होले, कामगार आघाडी अध्यक्ष शिवानंद पाटील, सोशल मीडिया अध्यक्ष विशाल भागवत, युवा मोर्चा उपाध्यक्ष स्वप्निल कुऱ्हाडे, राजेश वहिले, सुजित काशीद, कृष्णा पालवे, बाळासाहेब पालवे,
ओबीसी आघाडी उपाध्यक्ष किसन पालवे, ज्ञानेश्वर थोरवे यांचा समावेश आहे.


यावेळी मार्गदर्शन करताना बुट्टे पाटील म्हणाले, राज्यात देशात पक्ष कार्यकर्ते यांना संधी आहे. चांगले काम करा, पक्ष संघटनेचे काम वाढवा, रुसवे फुगवे बाजूला ठेवत एक दिलाने कार्यरत राहणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. येत्या काळात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणार आहे. प्रभावी कार्यकर्ते तयार केले जाणार आहे.

या संधीचे सर्वानी सोने करून पक्ष संघटनेचे तसेच राज्यातील, केंद्रातील विविध विकासाची लोकाभिमुख कार्य लोकांना माहिती व्हावी यासाठी पक्षाचे कार्यक्रमांचे रील करा, सोशल मीडियावर कमेंट करा, चांगल्या गोष्टी लाईक करा.

सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील पक्षाचे कार्य वाढवता येईल. सामान्य लोकांची कामे करा. बूथ वर काम करण्यासाठी तयारी करून सरल आणि नमो ॲप वर भाजपचे कार्यकर्ते क्रियाशील असले पाहिजेत. आळंदीत भाजपाचे माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत.

स्थानिक नगरसेवकांनी पुन्हा निवडून येण्यास पक्षाचे कार्यक्रमांना उपस्थित राहणे आवश्यक असून कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे. निवडणूक रचनेतील बुथचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन त्यांनी केले. यापुढील काळात आळंदीत पक्ष कसा वाढेल यासाठी संवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांना जो पर्यंत संधी मिळणार नाही तो पर्यंत पक्ष मोठा होणार नाही. प्रमुख कार्यकर्त्यांचे माध्यमातून आळंदीत काम करून विश्वास निर्माण करायचा आहे.

भाजपचे माध्यमातून घर चलो अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मेरी मिट्टी, मेरा देश उपक्रम सर्वत्र प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. आळंदी शहर युवा मोर्चा व आळंदी शहर भाजप पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देत नवीन कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांचे प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी जाहीर केली.

Recent Post

× How can I help you?