सम्राट विचार मंच च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन मोठ्या उत्साहात साजरा

पुणे: महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सात नोव्हेंबर शाळा प्रवेश दिन बोपोडी येथील भाजी मंडई त बालचमू ,आणि नागरिकांना लाडू  वाटप करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

सम्राट विचार मंच च्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीस सम्राटचे वीस वर्षां पासूनचे वाचक प्रसारक नंदू  कांबळे आणि धम्मबंधू राजेंद्र शेलार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अध्यक्ष स्थानी धम्मभगिनी कांता ढोणे, व्याख्याते ऍड. रमेश पवळे, कमलताई गायकवाड, सादिक शेख,जीवन घोंगडे, अंकुश साठे, सुरेश पवार इंद्रजित भालेराव, विजय जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली.

या वेळी प्रमुख उपस्थिती धम्मबन्धु अर्जुन कांबळे, नंदू भालेराव, विनोद यादव, करीम तुर्क, मैनुउद्दीन अत्तार, विनोद माने, नितीन मरफाळे, अकबर शेख,जय चव्हाण इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक दत्ता सूर्यवंशी, सूत्र संचालन इंद्रजित भालेराव आणि आभार ऍड. विठ्ठल आरुडे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद माने, विलास मोरे, शशिकांत पांडुळे, भगवान कांबळे, सिद्दीकी पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

× How can I help you?