शिक्षण प्रसारक मंडळाच्या यमुनानगर निगडी येथील शाळेत गोवत्स पूजन उत्साहात संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ०९ ऑक्टोबर २०२३)हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गोवंशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू धर्मात गाईला गोमाता संबोधून श्रद्धेय मानलेले आहे. देशी गाईच्या संवर्धनातून धनप्राप्ती बरोबरच पंचगव्याच्या उपयोगाव्दारे सुदृढ आरोग्य प्राप्त होते, असे मत नंद नंदिनी परिवाराचे अजित परांजपे यांनी व्यक्त केले.

    शिक्षण प्रसारक मंडळाच्या यमुनानगर, निगडी येथील शाळेत रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोवत्स पूजन पाच सवाष्ण महिला आणि पाच कुमारीका यांच्या हस्ते

उत्साहात करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गो मातेची आरती करण्यात आली. यावेळी परांजपे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगरसेविका सुमन पवळे, उत्तम केंजळे, शि. प्र. नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, उपाध्यक्ष गजेंद्र पवार, शि. प्र. मंडळ निगडी शाळा कार्याध्यक्ष ॲड. दामोदर भंडारी, सल्लागार सुधीर काळकर, मिलिंद देशपांडे, रवी रबडे, गिरीश वायकर, मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लिना वर्तक, उमा घोळे, रवींद्र मुंगसे, सविता बिराजदार आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या फेसबुक, इन्स्टाग्राम पेज आणि युट्यूब चॅनलचा शुभारंभ करण्यात आला.

शक्तिशाली भारताच्या निर्मितीसाठी आणि सुजाण नागरिक तयार करण्यासाठी निगडी शाळा विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. नुकत्याच सुरू केलेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पालक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी संपर्कात राहून पाल्यांच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकतात, असे ॲड. एस. के. जैन यांनी सांगितले.

    ॲड. दामोदर भंडारी यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या वसुबारस कार्यक्रमाचे महत्त्व विशद केले.

यावेळी सुधीर काळकर, राजेंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शोभा जोशी, आभार हेमंत बोऱ्हाडे यांनी मानले.

   यावेळी पालकांसाठी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थी, पालक शिक्षक, कर्मचारी वृंद उपस्थित होते.

× How can I help you?